देव आज डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 


देव आज डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 
माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम 
आटपाडी : देव आज डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियाद्वारे यांनी जनतेशी संवाद साधताना केले.
कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे राज्यात लॉकडाऊन असल्याने मुख्यमंत्री कोणतही घोषणा करणार याकडे जनतेचे लक्ष लागले होते. सुवातीला त्यांनी अक्षय तृतीया, रमजान आणि महात्म बसवेश्वर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच, सर्वांनी आपले सण-उत्सव घरात साजरे करुन मानवतेचा धर्म जपला, याबद्दल उद्धव ठाकरेंनी सर्वधर्मीय नागरिकांचे आभार मानले.  देशभरात आज सर्व मंदिरे बंद आहेत, मग देव कुठंयं असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर, तो देव आज डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये आहे, तो देव यांच्या माध्यमातून आपलं काम करत आहेत. माणसांत देव आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.


हे ही वाचा :- कापूस खरेदी केंद्रांना स्थानिक प्रशासनाने सहकार्य करावे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचना


राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या दोन पोलिसांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, काही जणांकडून राजकारण केलं जात आहे. मी या फंद्यात पडत नाही, सध्या कोरोनाच्या लढाईत लढायचं हे माझं प्राधान्यानं काम आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत राजकारण करणाऱ्या काहींना नितीन गडकरी यांनी चांगला सल्ला दिलाय. ही वेळ राजकारण करायची नाही, हे नितीनजींनी सांगितलंय. त्यामुळे मला त्यांचे आभार मानावे वाटतात, असे ते म्हणाले. 


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured