यपावाडी येथील एकास जमीन विकून टाक नाहीतर, जीवंत  ठेवणार नाही अशी धमकी व मारहाण

यपावाडी येथील एकास जमीन विकून टाक नाहीतर, जीवंत  ठेवणार नाही अशी धमकी व मारहाण


यपावाडी येथील एकास जमीन विकून टाक नाहीतर, जीवंत  ठेवणार नाही अशी धमकी व मारहाण
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : जमीन विकून टाक, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही. अशी धमकी व मारहाण यपावाडी येथील एकाच करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी अण्णासाहेब महादेव गवळी रा. यपावाडी यांची माडगुळे हद्दीमध्ये शेतजमीन आहे. या ठिकाणी शेततळ्याच्या कामासाठी आरोपी प्रशांत पांडूरंग विभुते रा. माडगुळे याने ट्रॅक्टर ट्रॉली ज्यादा भाड्याने का लावली नाही म्हणून फिर्यादी शिवीगाळी करून काठीने पायावर व दगडाने मारहाण केली. तसेच तू येथील तुझी जमिनीवरून टाक नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही म्हणून धमकी दिली. याबाबत आटपाडी पोलीस ठाणे येथे आरोपी प्रशांत पांडुरंग विभूते याच्याविरुद्ध आटपाडी पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.सं. नुअर ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कोरवी अधिक तपास करत आहे. सदरची घटना ही दि. १० रोजी माडगुळे ता. आटपाडी, जि. सांगली  गावच्या हद्दीत घडली.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments