५ एप्रिलला रात्री ९ वाजता घरोघरी दिवा लावू या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले आवाहन

५ एप्रिलला रात्री ९ वाजता घरोघरी दिवा लावू या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले आवाहन


५ एप्रिलला रात्री ९ वाजता घरोघरी दिवा लावू या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  देशवासीयांना केले आवाहन
नवी दिल्ली : ५ एप्रिलला रात्री ९ वाजता घरोघरी दिवा लावू या  असे आवाहन पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले आहे. त्यांनी आज व्हिडीओच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला.
देश्भारास संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे त्यामुळे देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आले. त्याला आज  ९ दिवस झाले. या काळात सर्वांनी एकत्र येऊन सरकार, प्रशासन यांनी आपापल्यापरिने यशस्वी केले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे विशेष आभार मानले. जनता कर्फ्यू, आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक हे भारताने जगाने शिकवलं. कोरोनाविरुद्ध जनता एकत्र येऊन सामूहिकरित्या ही लढाई लढतोय हे जनतेने दाखवून दिलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
सामूहिक शक्तीने आपण कोरोनाचा मुकाबला करत आहोत. देश ही इतकी मोठी लढाई लढताना आपल्या शक्तीचं दर्शन वारंवार घडवून देत आहे. कोरोनाच्या अंधकारातून प्रकाशाकडे जायचं आहे. कोरोना संकटामुळे गरिबांना सर्वात जास्त त्रास झाला आहे. या संकटातून त्यांना नवीन ऊर्जा मिळवून द्यायची आहे असे टे म्हणाले.
तसेच या कोरोनाच्या संकटाला प्रकाशित करण्यासाठी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता सर्वांनी ९ मिनिटं हवी आहेत. घरातील सर्व लाईट्स बंद करा, दरवाजे आणि बाल्कनीत उभं राहून दिवा, मेणबत्ती, टॉर्च अथवा मोबाईलची फ्लॅश लाईट सुरु करा. प्रकाशाच्या महाशक्तीमुळे आपण या युद्धाशी लढतोय आपण एकटे नाही तर १३० कोटी जनता एकाच संकल्पतेने लढतोय हे कळेल असं नरेंद्र मोदींनी सांगितले. परंतु त्यासाठी कोणालाही एकत्र जमायचं नाही, रस्त्यावर, गल्लीमध्ये परिसरात जमू नये, सोशल डिस्टेंसिगची लक्ष्मण रेषा ओलांडू नका, कोरोनाचं संक्रमण तोडण्यासाठी हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच बसून चे सर्व करायाचे आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments