डॉ. आंबेडकर शेती संस्थेकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ; गरजू लोकांना दोन वेळचे जेवण पुरविणार ; संस्थेच्या वतीने कम्युनिटी किचन सुरु करणार


डॉ. आंबेडकर शेती संस्थेकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
गरजू लोकांना दोन वेळचे जेवण पुरविणार ; संस्थेच्या वतीने कम्युनिटी किचन सुरु करणार
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगोला : डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था यांच्या वतीने सोनंद ता. सांगोला येथील गरजू कुटुंबाना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ठोकळे, सरपंच समाधान पाटील, नंदू मोरे, पोलीस पाटील विनायक काशीद, ग्रामविकास अधिकारी मोहिते आदी उपस्थित होते. 
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर देशभर संचारबंदी लागू करण्यात आली. संचारबंदी  नंतर देशातील शाळा, व्यापाराची केंद्र, उद्योग व्यवसाय जागच्या जागीच थांबले आहेत. संचार बंदी असल्याने सर्वच घरात बसून आहेत. याचा लोकांच्या जीवनमानावर खूप मोठा परिणाम झाला आहे. रोजगार आणि इतर कोणतेही आर्थिक उत्पन्नाचे साधन नसल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. समाजातील वृद्ध, अपंग, निराधार, एकल महिला, भूमिहीन, व गरीब शेतकरी यांना आपल्या कुटुंबाचे व्यवस्थापन करणे अवघड झाले आहे. शासनाच्या पातळीवर जरी मदत जाहीर झाली असली तरी ती अद्याप लोकांपर्यंत पोहोचली नसल्याने या काळात समाजातील आर्थिक आणि समाजिक दृष्ट्या मागास लोकांना मदत करणे गरजेचे असल्याने संस्थेच्या वतीने धान्य दिले असल्याचे ठोकळे यांनी सांगितले.
सोनंद येथील १२० कुटुंबाना प्रती कुटुंब ५ किलो गहू दोन किलो तांदूळ, एक किलो तूर डाळ, एक किलो तेल आणि एक साबण इत्यादी साहित्य देण्यात आले. समाजातील वृद्ध, अपंग, एकल निराधार महिला, गरीब कुटुंबे यांना ग्रामपंचायत सोनंद याच्या सहकार्याने धान्याचे आणि जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. गावपातळीवर सरपंच समाधान पाटील यांच्या पुढाकाराने निधी जमा करण्यात आला असून आणखी २०० लोकांना धान्य आणि जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले जाणार आहे.  येणाऱ्या काळात विविध संस्था संघटनाच्या माध्यमातून लोकांना जीवनावश्यक वस्तू व धान्याचे वाटप इतर गावातून केले जाणार आहे. समाजातील गरजू लोकांना दोन वेळचे जेवण पुरवण्याचे हि संस्थेचे नियोजन असून लवकरच डोंगरगाव आणि सोनंद या ठिकाणी कम्युनिटी किचन सुरु केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. धान्य वाटपाच्या कार्यक्रमास सोनंद गावातील झाकीर तांबोळी, रंगनाथ वाघमारे, धोंडीराम कांबळे, सुनील जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेने वाटप केलेल्या मदतीने गावातील लोकांकडून समाधान व्यक्त होत आहे. 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

Previous Post Next Post