लेंगरेत महात्मा बसवेश्वर जयंतीदिनी अभिवादन ; प्रतिमापुजन प्रसंगी सोशल डिस्टन्सिंगसह मास्क व सॅनिटायझर चा वापर करुन जयंती साजरी


लेंगरेत महात्मा बसवेश्वर जयंतीदिनी अभिवादन ; प्रतिमापुजन प्रसंगी सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझर चा वापर करुन जयंती साजरी
माणदेश एक्स्प्रेस न्यूज
लेंगरे : लेंगरे ता.खानापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीदिनी प्रतिमापुजन करण्यात आले. देशावर कोरोनाचे संकट असल्यामुळे यावेळी सोशल डिस्टस्टींग च्या नियमाचे पालन करण्यात आले तसेच यावेळी मास्क व सॅनिटायझर चा वापर करण्यात आला.
महात्मा बसवेश्वर महाराजांचे विचार समाजाला दिशादर्शक आहेत. आजच्या जयंतीदिनी सर्व समाजबांधवांना शुभेच्छा. आपण लॉकडाऊन नियमाचे पालन करुन महात्मा बसवेश्वर जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करुन प्रतिमेस अभिवादन करुन जयंती साजरी केली.


हे ही वाचा :- सोलापूरच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती


आपण आपल्या परिवारासह स्वतःची काळजी घ्या असे आवाहन सरपंच राधिका बागल यांनी यावेळी केले.यावेळी सरपंच राधिका बागल, उपसरपंच राणी कांडेसर, माजी उपसरपंच छाया सावंत, दिनकर शिंदे, प्रशांत सावंत, सदस्या शितल लांब, संगिता शिंदे, राणी ऐवळे, ग्रामसेवक वसंत माळी, श्रीशैल्य नष्टे, बसवेश्वर जंगम, नानासाहेब मंडलिक, नितीन चंदनशिवे आदी उपस्थित होते.


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured