Type Here to Get Search Results !

कोरोना पोहचला सांगोल्यात ; घेरडीमध्ये एकास लागण ; सोलापुरात कोरोना रुग्णाचा आकडा ५० वर ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती 


कोरोना पोहचला सांगोल्यात ; घेरडीमध्ये एकास लागण ; सोलापुरात कोरोना रुग्णाचा आकडा ५० वर ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती 
माणदेश एक्स्प्रेस न्यूज
सांगोला/सचिन धांडोरे : कोरोना ची लागण आता ग्रामीण भागातही होवू लागली असून सांगोला तालुक्यातील घेरडी येथील एकाला कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात आता कोरोना चा आकडा ५० च्या वर गेला असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माहिती देताना सांगितले. 
सध्यस्थितीत सोलापूर जिल्ह्यात विलगीकरण कक्षात ११२९, एकूण स्वॅब टेस्ट ९८७, अहवाल निगेटीव्ह ९३७, अहवाल पॉझिटीव्ह ५०, मृत, ०४ तर उपचार घेत असलेले ४६ कोरोनाग्रस्त आहेत. 
आज प्राप्त एकूण ८२ अहवालांमध्ये नव्याने ०९ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत तर ७३  जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज नव्याने पॉझीटीव्ह सापडलेल्या 9 व्यक्तींपैकी 5 जण  सारीच्या आजारातील असून पुर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.  तर वाढ झालेल्या रुग्णांमध्ये ४ शांती नगर, १ कुमठा नाका, १ लष्कर, २ मोदीखाना परिसरातील आहेत. तर १  रुग्ण सांगोला तालुक्यातील घेरडी येथील आहे. सांगोल्यात ज्या भागातून रुग्ण सापडला आहे त्या भागास कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे.


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies