भांबुर्डी येथे अज्ञातांनी लक्ष्मण सरगर यांचे जाळले घर ; संसारपयोगी साहित्य जळून खाक ; ३ लाख २६ हजाराचे नुकसान 


भांबुर्डी येथे अज्ञातांनी लक्ष्मण सरगर यांचे जाळले घर
 संसारपयोगी साहित्य जळून खाक ; ३ लाख २६ हजाराचे नुकसान 
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे :  भांबुर्डी (बालाजीनगर) ता. माळशिरस येथील लक्ष्मण बबन सरगर यांचे अज्ञातांनी राहते घर जाळले असून  घरातील संपूर्ण संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. सदरची घटना दि. ७ रोजी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मण बबन सरगर यांचे भांबुर्डी (बालाजीनगर) येथे पत्राकुदाचे राहते घर आहे. त्यांच्या कुटुंबांमध्ये एकूण ७ माणसे आहेत. ते सर्वजण घरापासून जवळच असलेल्या शेतामध्ये गेले होते. माघारी आल्यावर पाहिल्यावर त्यांचे संपूर्ण घर आगीमध्ये खाक झाले होते. या आगीमध्ये जीवनावश्यक वस्तु ५ पोती बाजरी, ३ पोती गहू, हरभरा २ पोती, शेतीची रासायनीक खते १३ पोती, पशुखाद्य पेंड ५ पोती, रोजच्या वापरातील भांडी, कपडे, मौल्यवान वस्तु सोने, रोख रक्कम २० हजार रुपये, फ्रिज, टिव्ही, सोपा सेट, कुलर, बेड हे आगीत भस्मसात झाले. यावेळी तलाठी तलाठी अमोल चव्हाण, पोलीस पाटील रावसाहेब वाघमोडे, कोतवाल बाळासाहेब चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत बंडगर, लक्ष्मण गोरड व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा असल्याची माहिती लक्ष्मण बबन सरगर यांनी दिली असून साधारणपणे ३ लाख २६ हजार ४०० रुपये एवढे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने या कुटुंबियांना मदत करावी असे आवाहन यावेळी गावातील नागरिकांनी केले आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


 


Post a Comment

Previous Post Next Post