Type Here to Get Search Results !

माणदेशातील "या" प्रसिद्ध देवीची यात्रा कोरोना च्या संकटामुळे रद्द 


माणदेशातील या प्रसिद्ध देवीची यात्रा कोरोना च्या संकटामुळे रद्द 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : माणदेशातील प्रसिद्ध असलेल्या आवळाई ता. आटपाडी, जि. सांगली येथील ग्रामदैवत मरिमाता देवीची यात्रा कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्यात आली आहे.
माणदेशामध्ये आवळाई येथील ग्राम दैवत मरिमाता देवीची यात्रा प्रसिद्ध आहे. सालाबाद प्रमाणे बौद्धपौर्णिमेला म्हणजेच डी. ७ व ८ मे ला सदर यात्रा संपन्न होणार होती. परंतु राज्यांमध्ये व देशांमध्ये कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे संचारबंदी कलम १४४ लागू करण्यात आल्याने संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन आहे.


जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कमर्चारी यांनी केलेल्या कार्याला सलाम !
तू विठ्ठल, मौला, मेरा, तु आसरा सबकुछ मेरा !



त्यामुळे दि. ७ मे रोजी  होणारी आवळाई येथील मरीमाता देवाची यात्रा स्थगित करण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन कमिटी आवळाई व ग्रामपंचायत आवळाई यांनी घेतला असून शासकीय नियमाप्रमाणे फक्त पुजारी देवीस नैवद्य दाखवणार आहेत. त्यामुळे दि. ७ मे रोजी होणारे यात्रा रद्द करण्यात आली असून भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत आवळाई यांनी केले आहे. 


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies