Type Here to Get Search Results !

म्हसवड शहरात ४० मोटारसायकली जप्त ; मोकाट फिरणाऱ्या नागरिकांवर फौजदारी कारवाई होणार 


म्हसवड शहरात ४० मोटारसायकली जप्त ; मोकाट फिरणाऱ्या नागरिकांवर फौजदारी कारवाई होणार 
म्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड शहरात विनाकारण  रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करुन  म्हसवड पोलीसांनी ४० मोटारसायकली जप्त केल्या. कोरोना रोखण्यासाठी भारतभर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून नागरीकांना घरात राहण्याचे आवाहन प्रशासनामार्फत वारंवार करण्यात येत असून देखील अद्याप विनाकारण रस्त्यावर फिरणारांची संख्या म्हसवड शहरात वाढत आहे. याला आऴा बसवण्यासाठी पोलीसांकडून अनेक प्रकारे प्रयत्न केले जात आहे. या मोकाट लोकांना आळा बसवण्याकरीता म्हसवड पोलीसांनी शहरातून लॉग मार्च काढून नागरीकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले होते. नागरीकांना वारंवार सूचना देऊन हि अनेक रिकामटेकडी काहीतरी कारणे सांगून रस्त्यावर भटकत आहेत. पोलीसांनी अडवले तर भाजीपाला किंवा औषधाचे कारण सांगून वेळ मारुन नेली जात आहे. जुन्या औषधांच्या चिट्ठ्या दाखवून, दुधाची किटली अथवा जुन्या घरातील गोळ्या खिशात टाकून पळवाटा काढताना दिसून येत आहेत. म्हसवड शहरात अशाप्रकारे लॉकडाऊनची सर्रास पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी म्हसवड पोलीसांनी बसस्टँऩ्ड परिसरात मोकाट फिरणाऱ्या ४० लोकांच्यावर कारवाई करुन त्यांच्या मोटारसायकली जप्त केल्या. यामुळे मोकाट फिरणाऱ्या नागरिकांना चांगलाच चाप बसला. 
सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर  सिंग यानी सकाळी ९ ते  दुपारी २ अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्याना  अशी वेळ ठरवून दिली आहे. या दिलेल्या वेळे शिवाय जर कोण रस्त्यावर आले तर मात्र निश्चित कारवाई केली जाईल असे सपोनि गणेश वाघमोडे यांनी लॉग मार्च दरम्यान स्पष्ट केले होते. परंतु सुधारण्यासाठी नियम नसतो हे म्हसवडकरांना माहिती नसावे. त्यामुळे वाहतूक शाखेचे संतोष बागल यांनी आज सकाळ पासून ४० मोटरसायकली जप्त केल्या आहेत. रस्त्यावर व गल्लीबोळात मोकाट फिरणाऱ्यावर फौजदारी खटले दाखल करण्याची प्रकिया चालू केली आहे. नागरीकांनी विनाकारण रस्त्यावर फिरु नये. यापुढे अधिक कठोर कारवाई करण्यात येणार आहे.


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies