लॉकडाऊनमुळे रसवंती व्यवसाय संकटात ; लाखोंचे नुकसान,यंदाचा हंगाम वाया


लॉकडाऊनमुळे रसवंती व्यवसाय संकटात ; लाखोंचे नुकसान,यंदाचा हंगाम वाया
माणदेश एक्सप्रेस न्युज
महूद/वैभव काटे : कोरोना चा उद्रेक झाल्याने सरकारला लॉककडाऊन करण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्याचीच झळ गावगाड्यापर्यंत पोहोचली आहे. याकाळात रसवंतीगृहाच्या घुंगरांचा बंद झालेला आवाज ऐकायलाच आला नाही. त्यामुळे लाखोंच्या उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ आली.
फेब्रुवारी महिन्यापासून रसवंती व्यवसाय सुरू होतात. यानंतर मार्च, एप्रिल, मे आणि जुनमध्ये लाखो रुपयांची उलाढाल या माध्यमातून होत असते. रसवंती व्यवसायातून रसवंती मालक, काम करणारे मजूर, तसेच प्रामुख्याने ऊस उत्पादक शेतकरी यांना मोठा फायदा होतो. 
उन्हाळ्याची चाहूल लागली की, गावात रस्त्याच्या बाजूला रसवंतीगृहाच्या घुंगरांचा खुळखुळ आवाज घुमू लागतो. रस्त्यावरून ये-जा करणारे सर्व घटक कुटुंबासह उसाच्या रसाचा आस्वाद घेतात. ग्रामीण भागासाठी हंगामी पण कमी भांडवलात करता येणारा व चांगले उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. महुद परिसरात अनेक रसवंतीगृह आहेत. ७७१ वाणाचा ऊस वापरला जातो. नागरिक शीतपेयापेक्षा रसपानगृहाला अधिक पसंती देतात. हा व्यवसाय शेती पूरक असल्याने शेतकऱ्यांची मुले यात अधिक आहेत. लागणारा ऊस सुद्धा विकत घेऊन तसेच आपल्या शेतामधील ऊस पिकवून ते यासाठी वापरतात. चार महिन्याचे काम व आठ महिने आराम असे या व्यवसायाचे स्वरूप आहे. या वर्षी हंगाम वाया गेल्याने आर्थिक घडी विस्कळीत झालेली असताना नुकसान कसे भरून काढायचे? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.


हे ही वाचा :-  विठ्ठलापूर मध्ये अज्ञाताकडून आकसापोटी वाईट कृत्य


सांगोला तालुक्यातील ग्रामीण भाग व पंढरपुर, महुद, आटपाडी महामार्गावर अनेक ठिकाणी दरवर्षी रसवंती सुरू होतात. यातून चांगल्या उत्पादनाच्या आशेने अनेक शेतकरी शेतात रसवंतीचा ऊस लागवड करतात. यावर्षी या सगळ्यांवरच आर्थिक संकट आले आहे. आता लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविण्यात आल्याने यावर्षीचा रसवंती व्यवसाय संपल्यात जमा आहे. नागरिकही थंड पदार्थाचे सेवन करणे टाळत असल्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतरही रसवंती व्यवसाय फार तग धरेल, असे दिसत नाही. परिणामी, संबंधित सर्वांवरच उपासमारीची वेळ आली असून अनेक रसवंत्या धुळखात पडल्या आहेत.


हजारोंचे उत्पन्न बुडाले
ऊसाच्या रसाबरोबरच दरवर्षी नागरिक उन्हाळ्यात शातपेये पिण्याला पसंती देतात. त्यामुळे हा व्यवसाय करणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. उन्हाळ्यात चार महिन्याच्या कालावधीत व्यवसायिक हजारो रुपयांचे उत्पन्न मिळवतात. या उत्पन्नाच्या आधारावर अनेक व्यावसायिकांचा पुढचे किमान आठ महिने उदरनिर्वाह चालतो.


सायकल ते हातगाडीवर व्यवसाय
उन्हाळ्यात ग्रामीण भागात गल्लोगल्ली भर उन्हात पोटाची खळगी भरण्यासाठी हातगाडी, सायकलीवर बर्फ गोळा, गारीगार, कुल्फी, आईसक्रिम, विकणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. यंदा या लॉकडाऊनमुळे ना विक्रेते दिसत आहे,ना ग्राहक दिसत आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured