माळशिरस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीला यश ; रेशन परवाना धारकांना मिळणार पोलीस संरक्षण

माळशिरस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीला यश ; रेशन परवाना धारकांना मिळणार पोलीस संरक्षण


माळशिरस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीला यश ; रेशन परवाना धारकांना मिळणार पोलीस संरक्षण
माणदेश एक्स्प्रेस न्युज
संजय हुलगे : रास्त धान्य दुकानदाराबददल होणाऱ्या वाढत्या तक्रारी व  दुकानदाराच्या आवश्यकतेनुसार संरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतच्या सुचना सहसचिव चारुशीला तांबेकर यांनी राज्यातील पोलीस आयुक्त व अधिक्षकांना पत्रादवारे केले आहे.  रास्त  धान्य दुकानदारांना विमा कवच मिळावे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेसह अनेक संघटनांनी निवेदनादवारे मागणी केली होती.  कोरोना विषाणूच्या प्रार्दूभावामुळे परस्थितीचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी  रास्त धान्य  दुकानामार्फत अन्न धान्य पुरवठा करण्याचे येत आहे. वाढती मागणी व वाढती गर्दी लक्षात घेता रेशन दुकानदार व नागरिक यांच्यात वारंवार तंटे निर्माण होत आहेत. तसेच कोरोना विषाणूचा प्रतिबंध रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग चे कोटेकोरपणे पालन करण्यात यावे व सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरुळीत चालावी या करिता पोलीस बंदोबस्त मिळावा ही मागणी शासनाने मान्य केली आहे.


जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कमर्चारी यांनी केलेल्या कार्याला सलाम!
तू विठ्ठल, मौला, मेरा, तु आसरा सबकुछ मेरा ! आभार गीत
स्वाभिमानी  शेतकरी संघटनेकडून शासनाच्या निर्णयाचे स्वागत 
स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून केलेल्या मागणीची   शासनाने दखल  घेऊन पोलीस कर्मचारी यांची  रेशन दुकानावर नेमणुकीचा  आदेश  काढला आहे. या निर्णयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वागत करत असून सोशल डिस्टन्सिंग व होणारे वाद विवादाला आळा बसेल  व कायदा सुव्यवस्था अबाधित राहिल.  रास्तभाव दुकानदारांना विमा कवच मिळावे या मागणीचाही सहानीभूतीपूर्वक विचार करावा व ही  मागणी लवकरात लवकर  मंजूर करावी व रास्तभाव दुकानदाराचे मनोधैर्य वाढवावे. म्हणूण लवकरात लवकर  विमा संरक्षण मिळावे.
अजित बोरकर 
तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस 


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

0 Comments