माळशिरसच्या तहसीलदारांची प्राण्यांवर दया ; गुप्तलिंग येथील वानरांसाठी पाठवली फळे

माळशिरसच्या तहसीलदारांची प्राण्यांवर दया ; गुप्तलिंग येथील वानरांसाठी पाठवली फळे


माळशिरसच्या तहसीलदारांची प्राण्यांवर दया ; गुप्तलिंग येथील वानरांसाठी पाठवली फळे
माणदेश एक्सप्रेस न्युज
पिंपरी/बाळासाहेब कर्चे : माळशिरस तालुक्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी मुक्या प्राण्यांवर दया दाखवत श्री. क्षेत्र गुप्तलिंग येथील वानरांसाठी फळे पाठवून त्यांच्या पोटाची व्यवस्था केली.
श्री. क्षेत्र गुप्तलिंग हे सोलापूर जिल्ह्यातील व माळशिरस तालुक्यातील शेवटचे टोक असून तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी बाराही महिने भाविकांची गर्दी असते. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या वानरांना येणाऱ्या भाविकांकडून सतत अन्नदान होत असते. परंतू सद्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून लॉकडाऊन मुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सिमा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. देशभरातील मंदिरे बंद ठेवण्यात आली असून भाविकांना मनाई करण्यात आली आहे. अशा बिकट परिस्थिती मध्ये गुप्तलिंग येथील वानरं काय खात असतील? याचा विचार करून येथील तहसिलदार अभिजित पाटील यांनी मुक्या प्राण्यांवर दया दाखवत त्यांच्या पोटाची व्यवस्था करण्यासाठी केळी, पेरु व रामफळं शासकीय गाडीमध्ये आणत भवानी घाटातील जिल्हा हद्दीपासून जिल्हाबंदीचा आदेश पाळून मोटारसायकल वरून श्री. क्षेत्र गुप्तलिंग येथील मंदिरात महंत आनंदगिरी महाराज यांचेकडे पोहोच केली असून दररोज वानरांना खाऊ घालण्यास सांगितले.यावेळी निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख,  महसूल नायब तहसीलदार श्री.काळे, वायदंडे, उपसरपंच हणमंत कर्चे, ग्रामसेवक हरीश्चंद्र  करे, पोलीस पाटील नानासाहेब कर्चे, ग्रा.प.सदस्य दादासाहेब कर्चे, शरद कर्चे व जिल्हाबंदीच्या ग्रामरक्षा पथकातील सर्व युवक उपस्थीत होते.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस FreePost a comment

0 Comments