विटा शहरात गरजूंना मदतीचा ओघ सुरु ; कोरोना विरुध्दचा लढा : विटेकर व्यावसायिकांची माणुसकी 

विटा शहरात गरजूंना मदतीचा ओघ सुरु ; कोरोना विरुध्दचा लढा : विटेकर व्यावसायिकांची माणुसकी 


विटा शहरात गरजूंना मदतीचा ओघ सुरु
कोरोना विरुध्दचा लढा : विटेकर व्यावसायिकांची माणुसकी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा/प्रतिनिधी :  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. अशा संकटकालीन परिस्थितीत हातावर पोट असलेल्या कामगार, गोरगरीब जनतेला उदारनिर्वाहासाठी माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील, नगराध्यक्षा प्रतिभा पाटील,  उपनगराध्यक्ष अजित गायकवाड,  आरोग्य सभापती फिरोज तांबोळी, माजी उपनगराध्यक्ष संजय तारळेकर, मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी मदतीसाठी केलेल्या आवाहनास उत्फूर्त प्रतिसाद देत विटा येथील किराणा माल असोशिएशन यांचेवतीने शहरातील गोर गरीब, कामगार, मजूरांना जीवनावश्यक वस्तू व धान्यादी माल देऊन मदत करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. 
प्रत्येक विटेकर आपआपल्या परिने मदत करत आहे. कोरोना विरुध्दच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत हे मदत कार्य अविरतपणे सुरु आहे. विटा येथील किराणा माल असोशिएशनचे अध्यक्ष पांडूरंग डोंबे, उपाध्यक्ष क्रांतीलाल जोगड, सिध्देश्वर शेटे, शितल जोगड, तुषार मेहता, बापू तारळेकर, किशोर लांब,शिरिष जोगड, गजानन लांब, महामुद्दीन तांबोळी, सोनम मसाले, प्रकाश मसाले, व्यंकटेश्वर मसाले, निलेश टी सेंटर, कृष्णा मसाले, यांचेसह इतरांनी या मदत कार्यात योगदान देत गरंजूंना भरीव मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. या मदतीतून अनेकांच्या संसाराला हातभार लागण्यास मदत होणार आहे. मदतीच्या या कार्यामुळे विटेकर नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


 


Post a Comment

0 Comments