Type Here to Get Search Results !

निगडीच्या त्या तरुणाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह :जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी


निगडीच्या त्या तरुणाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह :जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : शिराळा तालुक्यातील निगडी येथील महिला व तिचा भाऊ यांना मिरज येथील आयसोलेशन कक्षात ॲडमिट करण्यात आले होते. यापैकी महिलेचा कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सदर महिलेच्या भावाचा कोरोणा चाचणी अहवाल आज निगेटिव्ह आला आहे. या कुटुंबाशी संबंधित 5 जण मिरज येथे आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले असून निकट संपर्क बाधित 14 जणांना शिराळा येथे हे इन्स्टिट्यूशन क्वारंटाइन मध्ये ठेवण्यात आले आहे . त्यांचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली आहे. सद्यस्थितीत मिरज येथील आयसोलेशन कक्षात १२ लोक उपचार घेत असून यातील  ५ निगडी येथील कुटुंबाशी संबंधित आहेत तर ७ जणांमध्ये इस्लामपूर येथील खाजगी डॉक्टर व त्यांचा स्टाफ यांचा समावेश आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies