घेरडीत संचारबंदीचे उल्लंघन  ; जमावबंदी असताना असताना घोडा व बैलगाडी शर्यतीचे आयोजन ; आयोजकासह १० जणावर गुन्हे दाखल 

घेरडीत संचारबंदीचे उल्लंघन  ; जमावबंदी असताना असताना घोडा व बैलगाडी शर्यतीचे आयोजन ; आयोजकासह १० जणावर गुन्हे दाखल 


घेरडीत संचारबंदीचे उल्लंघन 
जमावबंदी असताना असताना घोडा व बैलगाडी शर्यतीचे आयोजन ; आयोजकासह १० जणावर गुन्हे दाखल 
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : संचारबंदीच्या काळात शासनाच्या आदेशाचा भंग करत घेरडी ता. सांगोला येथे चक्क घोडागाडी व बैलगाड्यांची शर्यत आयोजित करण्यात आली होती. याप्रकरणी संयोजक संतोष नामदेव खांडेकर रा. घेरडी याच्यासह बैलगाडी व घोडागाडीच्या अज्ञात दहा चालकांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी देशात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. संचारबंदी असल्याने फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना घरातच बसण्याचे आवाहन केले आहे. मात्र काहीजण शासनाच्या आदेशाचा भंग करत असल्याचे दिसून येत आहे. असाच काहीसा प्रकार घेरडी येथे घडला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैल व घोडागाडी यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यास प्रतिबंध केला आहे. शासनाच्या आदेशाचा भंग करत घेरडी येथे संयोजक संतोष खांडेकर यांनी बैलगाडी व घोडागाडी यांच्या शर्यतीचे 31 मार्च रोजी आयोजन केले होते. राज्य शासनाच्या आदेशाचा भंग करत 5 बैल व घोडा जोडीच्या गाड्याची शर्यत घेत साधारणतः सहा किमी पळवले होते. बैल व घोडा जोडीच्या गाड्या पळवणाऱ्या चालकांनी बैल व घोडा जोरात पळवण्यासाठी चाबकाने मारण्याचा प्रकार देखील घडला होता.
याप्रकरणी पोना संजय चंदनशिवे यांनी बैलगाडी शर्यतीचे संयोजक संतोष नामदेव खांडेकर, बैल व घोडा जोडी गाड्यांचे 10 अज्ञात चालक यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात भादविक 188, 269, 270, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 (1)(अ), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सन 2005 चे कलम 51 (ब), महाराष्ट्र पोलीस कायदा सन 1951 चे कलम 37(13)/135, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम सन 1897 चे कलम 2, 3, 4 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोना मोहोळकर करीत आहेत.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments