चोरट्यांना ना कोरोनाची भिती ना संचारबंदीची ; आटपाडीतील मंगलमुर्ती मॉल फोडून ५४ हजाराची चोरी ; काजू, बदाम, पिस्ता, केशरची चोरी 

चोरट्यांना ना कोरोनाची भिती ना संचारबंदीची ; आटपाडीतील मंगलमुर्ती मॉल फोडून ५४ हजाराची चोरी ; काजू, बदाम, पिस्ता, केशरची चोरी 


चोरट्यांना ना कोरोनाची भिती ना संचारबंदीची
आटपाडीतील मंगलमुर्ती मॉल फोडून ५४ हजाराची चोरी ; काजू, बदाम, पिस्ता, केशरची चोरी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : संपूर्ण देशामध्ये कोरोना मुळे संचारबंदी असताना ती चोरट्यांना कदाचित माहित नसावी. कारण त्यांना आटपाडीतील मंगलमुर्ती मॉल फोडून तब्बल ५४ हजार रुपयांची चोरी केल्याने चोरटे कदाचित कोरोनाला सुद्धा भीत नसावे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, आटपाडी शहरातील बस स्थानक रोडला शशिकांत शिवाजी काळेबाग यांचे मंगलमुर्ती मॉल या नावाने किराणा मालाची मोठी शॉपी आहे. यामध्ये जीवनाश्यक वस्तूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने मंगलमुर्ती मॉल आटपाडीमध्ये प्रसिद्ध आहे. परंतु अज्ञात चोरट्यांनी मॉल च्या मागील बाजूने प्रवेश करून पत्रा कट करून मॉल मध्ये प्रवेश करून आतमध्ये असणाऱ्या पिस्ता, बदाम, काजू, संतूर साबण, गोडेतेलाचे डबे, मिरे, लवंग, वेलची, केशर व रोख रक्कम १३ हजार रुपये असे एकूण ५४ हजार रुपयांची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली आहे. याबाबत शशिकांत शिवाजी काळेबाग यांनी आटपाडी पोलीस ठाणेमध्ये फिर्याद दाखल केली असून पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोफौ भांगरे करीत आहेत.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments