खरसुंडीच्या श्री. सिद्धनाथाची चैत्री यात्रा रद्द ; प्रशासन व देवस्थान समिती यांची बैठक संपन्न

खरसुंडीच्या श्री. सिद्धनाथाची चैत्री यात्रा रद्द ; प्रशासन व देवस्थान समिती यांची बैठक संपन्न


खरसुंडीच्या श्री. सिद्धनाथाची चैत्री यात्रा रद्द ; प्रशासन व देवस्थान समिती यांची बैठक संपन्न
माणदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी :  महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथीला लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खरसुंडी ता. आटपाडी, जि. सांगली येथील दिनांक २० एप्रिल रोजी होणारी चैत्री यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.
शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ देवाची सासनकाठी यात्रा दिनांक १४ एप्रिल ते  २० एप्रिल रोजी भरणार होती. या बैठकीस आटपाडीचे तहसीलदार सचिन लंगुटे, देवस्थान समितीचे चेअरमन चंद्रकांत पुजारी, भरत पाटील, सरपंच सौ. लता अर्जुन पुजारी, उपसरपंच नितीन पुजारी, मंडल अधिकारी श्री. कांबळे, तलाठी संतोष पवार, ग्रामसेवक शशिकांत शिंदे, त्यांच्यासह  राहुल गुरव, अर्जुन पुजारी, जितेंद्र पाटील, छगन साळुंखेआदि उपस्थित होते. यावेळी कोरोना या संसर्गजन्य विषाणुच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती देवस्थान समिती व यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात असून भाविक भक्तांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments