देशातील निवणूका एक वर्ष पुढे ढकला : अॅड. सोमनाथ वाघमोडे 

देशातील निवणूका एक वर्ष पुढे ढकला : अॅड. सोमनाथ वाघमोडे 


देशातील निवणूका एक वर्ष पुढे ढकला : अॅड. सोमनाथ वाघमोडे 
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे :  कोरोना या महाभयाकंर विषाणुमुळे देशभर लॉकडाऊन सुरु असुन त्यांचा माणसाच्या दैनंदीन जीवनामध्ये खुप मोठा परिणाम झाला असुन अर्थकारण डबघाईला आले आहे. हे सर्व सुधारण्यासाठी किमान एक वर्षांचा कालावधी लागणार असुन केंद्र सरकार त्याबाबत योग्य ते निर्णय घेत आहेत. आरबीआयने देशातील खातेदारांना दिलासा देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. तसेच राज्य सरकार देखील कठोर पाऊले उचलत आहेत, सामान्य माणसाला धीर देण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य सरकार मनापासुन करीत आहेत. देशावरचे संकट कमी करण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करताना दिसत आहे. संपुर्ण देशात शेतकरी, शेतमजुर, लहान मोठे उद्योग सह सर्व जण अडचणीत आले आहेत. हे सर्व पुर्वपदावर येण्यासाठी किमान एक वर्ष तरी लागेल. अशी शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील येणाऱ्या सर्व निवडणूका एक वर्षभर पुढे ढकलण्यात यावेत हि मागणी देशाच्या निवडणूक आयोगाकडे अॅड. सोमनाथ वाघमोडे  यांनी केली आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments