माळशिरस मध्ये युवकाचा दोरीने गळा आवळून खून

माळशिरस मध्ये युवकाचा दोरीने गळा आवळून खून


माळशिरस मध्ये युवकाचा दोरीने गळा आवळून खून
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : माळशिरस मध्ये युवकाचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना काल दि. १ मे रोजी रात्री घडली असून रोहित दत्तू रणदिवे  (वय.19 रा.म्हसकोबा मंदिर माळशिरस) असे खून झालेल्या युवकाचे नांव आहे. याबाबत रुक्मिणी रणदिवे यांनी माळशिरस पोलिसांत फिर्याद दाखल केली. या खून प्रकरणी  आरोपी अमोल उत्तम पवार, सचिन विष्णू शेगर, अक्षय नारायण इंगोले रा. सर्व. माळशिरस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत रोहित दत्तू रणदिवे आई व भावासह श्रीनाथनगर येथे राहत होते. घटने दिवशी संध्याकाळी सातच्या सुमारास तो घरी जेवत असताना सचिन शेगर व अमोल पवार हे दोघे त्याच्या घरी आले. गावात भांडण झाले आहे आपण तिकडे जाऊ असे म्हणून त्यास दोघे घेऊन गेले. त्यानंतर मयत रोहित रणदिवे हा रात्रभर घरी परत आलाच नाही. सकाळी सातच्या सुमारास सचिन शेगर हा त्याच्या घरी व रोहित याची विचारपूस केली तेव्हा त्याच्या आईने रोहित घरी आला नसल्याचे सांगितले. त्यानंतर चला आपण त्याला पाहुया असे म्हणून आईला सोबत घेऊन शोधू लागला परंतू रोहित हा मिळून आला नाही. रोहित शोधूनही न सापडल्याने त्याच्या आईने सचिन शेगरला सोबत घेऊन माळशिरस पोलिस ठाण्यात येऊन रोहित काल राञी पासून बेपत्ता असल्याचे पोलिसांना माहिती दिली. 
त्यानंतर पोलिसा समवेत शोध घेत असतानाच रोहितच्या आईने रोहित हा काल सचिन शेगर सोबतच गेला असल्याचे सांगितले. पोलिसांनी सचिन शेगर ला पोलिसी खाक्या दाखवताच सचिन शेगरने मी अमोल पवार व अक्षय इंगोले आम्ही तिघांनी मिळून नायलॉनच्या दीरीने गळा आवळून खून केल्याची कबुली देऊन सदरचा मृतदेह तहसिल कार्यालयाच्या बाजूला एक पोत्यात भरून टाकल्याची सांगितले व जागा दाखविली. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु हे तपास करीत आहेत.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a comment

0 Comments