कोरोना विषाणू विरोधातील लढ्यामध्ये टपाल खात्याचे कर्मचारी सेवा देण्यासाठी सक्रीय : ज्ञानेश कुलकर्णी 


कोरोना विषाणू विरोधातील लढ्यामध्ये टपाल खात्याचे कर्मचारी सेवा देण्यासाठी सक्रीय : ज्ञानेश कुलकर्णी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
 कवठेमहांकाळ : ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी AEPS या सेवेद्वारे कोणत्याही बँकेतील आधार कार्ड लिंक असलेल्या खातेदारांना तत्काळ पैसे वितरण करण्याचे काम पोस्टातील कर्मचाऱ्यांद्वारे  सक्रिय पणे चालू असून जनतेने याचा लाभ घ्यावा व टपाल कर्मचाऱ्यान सहकार्य करावे असे आवाहन विटा/जत उपविभागाचे डाक निरीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी केली कवठेमहांळ तालुक्यातील कुची पोस्ट ऑफिसला त्यांनी अचानक भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. 
ते पुढे म्हणाले लॉकडाऊन काळात सार्वजनिक व खाजगी वाहतूक बंद असताना ग्रामीण भागातील रुग्णालये व आजारी पेशन्टना दिलासा देण्यासाठी व मदत करण्यासाठी टपाल खात्याने पार्सलद्वारे औषधाचा पुरवठा करण्याचे काम चालू केले आहे. सेवा निवृत्त कर्मचारी वयोवृध्द नागरिक यांना तातडीने सेवा देण्यासाठी स्थानिक पोस्टमनशी संपर्क साधून फोनद्वारे १० टे १५ मिनिटा मध्ये बँक खात्यातील रक्कम पोस्टाद्वारे ग्राहकांना घरपोच देण्याची सुविधा चालू झाली आहे. तसेच वीज बिल, पाणी बिल, टीव्ही, मोबाईल रिचार्ज, तसेच बँकेतील पैसे ट्रान्स्फर करणे ही सेवा पोस्टमन चा मदतीने सुरू आहे. लॉकडाऊन काळात जत उपविभागाने AEPS या सेवेद्वारे ५००० पेक्षा जास्त ग्राहकांना ७१३०९८५ एवढ्या रकमेचे वितरण करून ग्रामीण भागातील व सर्व सामान्य जनतेला कोरोना महामारी वादळामध्ये दिलासा दिला आहे.
कुची टपाल कार्यालयासमोर पैसे काढण्यासाठी लागलेली रांग ही  योग्य सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर इ. प्रतिबंधक उपाय पाहून तातडीने त्यांना 'सेवा देणाऱ्या लढ्यातील योध्दे' अशा शब्दात डाक निरीक्षक श्री. ज्ञानेश कुलकर्णी यांनी कौतुक केले. ग्रामस्थांनी गर्दी टाळून सुरक्षित अंतरावर रांगेत उभा राहून कोरोना नियमाचे पालन करावे असे आवाहन वयोवृध्द नागरिकांशी ज्ञानेश कुलकर्णी यांनी थेट संवाद साधताना म्हणाले. लोकांनी चांगली सेवा मिळत असल्याचे समाधान व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील यांनी सेवा देणाऱ्या टपाल कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली. सरपंच सौ. वैशाली पाटील, उपसरपंच विजय पाटील, हनुमान मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष विठ्ठल गुरव तसेच गावातील प्रतिष्ठत नागरिक, ग्रामस्थ यांच्याकडून चांगले सहकार्य लाभत असल्याची माहिती पोस्टमास्तर शंकर कदम यांनी सांगितले. यावेळी डाक निरीक्षक ज्ञानेश कुलकर्णी, पोस्टमन अनिल कुलकर्णी, सुभाषचंद्र देशपांडे यांचे कुची ब्राचं ऑफिसच्या वतीने शंकर कदम व शिवानंद मंगवडे यांनी स्वागत केले. एकाच दिवशी AEPS याद्वारे कुची पोस्टाने ८० लोकांना सेवा देण्याचे काम केले आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

Previous Post Next Post