श्री.शंकर सह.साखर कारखान्याच्या संचालकाकडून गरजु कामगारांना स्व: खर्चातुन जीवनावश्यक साहित्याचे वाटप


श्री.शंकर सह.साखर कारखान्याच्या संचालकाकडून गरजु कामगारांना स्व: खर्चातुन जीवनावश्यक साहित्याचे वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
सदाशिवनगर/विष्णू भोंगळे :  श्री.शंकर सह.साखर कारखान्याचे चेअरमन माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे वाढदिवसा निमित्त कारखान्याच्या गरजू कामगारांना ४८ जीवनाश्यक वस्तूचे साहित्य असलेले कीट कारखान्याचे व्हा. चेअरमन मिलिंद (दादा) कुलकर्णी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कारखान्याचे विद्यमान संचालक सुनिल माने, शिवाजी गोरे, कोरटकर बापु, सुरेश मोहिते या चार संचालकानी गरजु कामगारांना स्व:खर्चातुन किटचे व धान्याचे वाटप केले. तसेच कामगार प्रतिनिधी व विजय भारत गॅस वितरक दहिगावचे विजय व उदय पाटील यांचे कडून मास्क वाटप करण्यात आले. यावेळी दत्तु वाघमोडे, दत्तु रणनवरे, चंदकांत शिंदे, प्रशात दोशी, सुभाष सुज्ञे, रविराज जगताप, संजय पाटील, ज्ञानदेव पवार, उदय पाटील, श्री. गायकवाड, श्री. कदम उपस्थित होते.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad