या गावात अंतर्गत रस्त्यासाठी 25/15 योजनेतून १९ लाख रुपये मंजूर 


या गावात अंतर्गत रस्त्यासाठी 25/15 योजनेतून १९ लाख रुपये मंजूर 
माणदेश एक्सप्रेस न्युज
दिघंची : आमदार अनिलभाऊ बाबर आणि तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिघंची गावासाठी 25/15 योजनेतुन रस्ता काँक्रीटकरणासाठी 19 लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे.
यामध्ये सिराज तांबोळी घर ते दिलीप चोथे घर रस्त्यासाठी 7 लाख रुपये, सिद्धनाथ मंगल कार्यालय ते सुरापूर पेठ रस्त्यासाठी 5 लाख रुपये तर मोहनभाऊ मोरे यांच्या घरापासून ते तलाठी कार्यालय रस्त्यासाठी 7 लाख रुपये असा एकूण 19 लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती सरपंच अमोल मोरे यांनी दिली. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांचा प्रश्न निकालात निघाल्याने नागरिकांमधुन समाधान व्यक्त होत आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Join Free Telegram माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

Previous Post Next Post