जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या घोषणेचे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी केले स्वागत


जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या घोषणेचे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी केले स्वागत
माणदेश एक्सप्रेस न्युज
पाचेगाव/वार्ताहर : कृष्णा नदीच्या पुराचे पाच ते सहा टीएमसी पाणी यंदा दुष्काळी भागाला देण्यात येणार आहे. या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या घोषणेचे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. यातुन दुष्काळी भागातील तलाव भरण्यात येणार आहेत. याचा लाभ सांगोला तालुक्यातील टेंभू, म्हैशाळ योजनेच्या चोवीस हजार हेक्टर लाभक्षेत्रातील सत्तावीस गावातील शेतकऱ्यांना होणार आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या महाविकास आघाडीच्या सरकारने घेतलेला हा निर्णय दिलासादायक आहे. यामुळे टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रातील पाचेगाव बुद्रुक, किडेबिसरी, कोंबडवाडी, कोळे, जुनोनी, कराडवाडी, गौडवाडी, हटकर मंगेवाडी, राजुरी, पाचेगाव खुर्द, मिसाळवाडी, उदनवाडी, वाटंबरे, डोंगरगाव, सोनंद, जवळा, कडलास, मानेगाव, लोणविरे, अकोला वासुद तसेच म्हैशाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील डिकसळ, हंगिरगे, घेरडी, पारे, हबिसेवाडी व अन्य गावातील शेतकऱ्यांना होणार आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस


 


Post a comment

0 Comments