'आयएफएससी' मुंबईबाहेर गेल्यास, मुंबईतून केंद्राला जाणारा कर रोखण्याचा 'या' खासदाराचा थेट केंद्र सरकारला इशारा 


आयएफएससी मुंबईबाहेर गेल्यास, मुंबईतून केंद्राला जाणारा कर रोखण्याचा या खासदाराचा थेट केंद्र सरकारला इशारा 
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : "केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र' (आयएफएससी) गुजरात येथे हलविण्याचा घेतलेला निर्णय आक्षेपार्ह आहे. त्यामुळे आयएफएससी मुंबईबाहेर गेल्यास, मुंबईतून केंद्राला जाणारा कर रोखला जाईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
जगभरातील आर्थिक घडामोडींशी ताळमेळ साधणारे, ' आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र' मुंबईतच असावे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई शेअर बाजार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांसह अनेक महत्वाच्या आर्थिक संस्था मुंबईत आहेत. तसेच ' आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र' मुंबईतच असावे, असा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. त्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील जागाही निश्चित करण्यात आली होती. परंतु केंद्र सरकारने आकसापोटी ही जागा मेट्रो रेल्वेसाठी आरक्षित करून आयएफएससी मुंबईत उभारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रतिकूल परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप खासदार शेवाळे यांनी याअगोदर लोकसभेत केला होता. मुंबईतून केंद्राला दरवर्षी सुमारे पावणे दोन लाख कोटींचा कर दिला जातो. तसेच देशभरातील 90 टक्के व्यापारी बँकिंग, 80 टक्के म्युच्युअल फंड ची नोंदणी मुंबईतुन होते. त्यामुळे आयएफएससी मुंबईबाहेर नेल्यास, केंद्र सरकारला या अन्यायकारक निर्णयाची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे खासदार राहुल शेवाळे यांनी स्पष्ट करीत केंद्र सरकारला इशारा दिला आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured