Type Here to Get Search Results !

मनसेच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न 


मनसेच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : मानवतेचा शत्रु कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. आपल्या महाराष्ट्रातही कोरोना  बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. काही बांधवांचे कोरोनाने बळी घेऊन त्यांचे संसार उध्वस्त केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. भविष्यात रुग्णांवर उपचार प्लाझ्मा थेरपी ने करत असताना रक्ताचा तुटवडा उदभवू शकतो. अहोरात्र झुंजणाऱ्या आरोग्य सेवेत याचा परिणाम होऊ नये, म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राजमुद्रा ग्रुप जांभुळणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. ७ रोजी रक्तदान शिबिर पार पडले. कोरोना संकटात रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद देऊन मानवतेच्या या लढयात सामान्य जनता सोबत असल्याचे दाखवून दिले. यावेळी शिबिरीला मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष राजेश जाधव. पडळकरवाडीचे ग्रा.पं. सदस्य अमोल पडळकर, सागर बेरगळ यांनी भेट दिली.
 यावेळी श्री वसंतदादा पाटील रक्तपेढी च्या सहकार्यने आणि गावचे उपसरपंच दगडू जुगदर, ग्रा.पं. सदस्य मोहन माने मनसेचे ता उपाध्यक्ष शरद ढोकळे, राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष शरद जुगदर, गावचे प्रतिष्ठित नागरीक बाजीराव मासाळ, तुषार जुगदर,  नवाज मुलाणी,   या सर्वांनी मिळून रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडले.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


 


Join Free Telegram माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies