पान दुकान उघडण्यास परवानगी नाही : आटपाडी तालुका पानपट्टी असोशियशनचे तालुकाध्यक्ष विजय लोखंडे यांची माहिती 

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यामध्ये ऑरेंज झोन असला तरी जिल्ह्यामध्ये पान दुकान उघडण्यास राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील कोणीही आपली पाने दुकाने उघडू नयेत असे आवाहन आटपाडी तालुका पानपट्टी असोशियशनचे तालुकाध्यक्ष विजय लोखंडे यांनी तालुक्यातील पानपट्टी चालकांना केले आहे. आज दिनांक 3 मे 2020 रोजी अन्न-औषध प्रशासनाचे जिल्हा सहायक आयुक्त श्री.सुकुमार चौगुले यांच्या बरोबर जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे फोनवर चर्चा केली. यावेळी श्री चौगुले यांनी पान दुकान उघडण्यास शासनाने परवानगी दिलेली नाही असे सांगितले आहे. त्यामुळे शासनाचा निर्णय आल्या नंतर सर्व पान दुकानदारांना असोसिएशनच्या वतीने कळविण्यात येईल. तोपर्यंत एकाही पान दुकानदाराने दुकान उघडु नये असे असे विजय लोखंडे यांनी स्पष्ट केले आहे.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Post a Comment

0 Comments