भिकवडीत दहा वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण ; सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १४ वर 

भिकवडीत दहा वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण ; सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १४ वर 

भिकवडीत दहा वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण ; सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १४ वर 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : गुजरात अहमदाबाद येथून खानापूर तालुक्यातील साळशिंगे, तासगाव तालुक्यातील गव्हाण हे सांगली जिल्ह्यातील तर माण तालुक्यातील विरळी येथे काही लोक आले होते. या कुटुंबासोबत या दहा वर्षाच्या मुलाने अहमदाबाद ते भिकवडी (ता.कडेगाव) असा प्रवास केला होता. सांगली जिल्ह्यात आल्यानंतर त्याला संस्था क्वारंटाईन करण्यात आले होते. दोन दिवसापूर्वी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने मिरजेच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल केले होते. याठिकाणी त्याचा स्वब घेण्यात आला होता. याचा अहवाल शुक्रवारी पहाटे प्राप्त झाला. त्यामध्ये तो पॉझिटिव आढळला आहे दरम्यान या मुलाचे आई-वडील निगेटिव्ह असल्याचेही समोर आले. सध्या जिल्ह्यात उपचारातील रुग्ण संख्या आता 14 वर जाऊन पोचली आहे.

Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस

Post a Comment

0 Comments