राज्यातील अडकलेल्या नागरिकांना एस.टी. पोहचविणार सुरक्षित घरी 


राज्यातील अडकलेल्या नागरिकांना एस.टी. पोहचविणार सुरक्षित घरी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : राज्यात संचारबंदी व लॉकडाऊनमुळे अनेक भागात नागरिक अडकले आहेत. या नागरिकांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी एसटी महामंडळाच्या बस धावणार असून नागरिकांना मात्र यातून विनामूल्य प्रवास करता येणार आहे.  
राज्यातील अडकलेले विद्यार्थी, मजूर,पर्यटक यांच्यासाठी  त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात जाण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याने प्रत्येक नागरिकाला यामुळे सुरक्षित आपल्या घरी जाण्यास मदत होणार आहे. लॉकडाऊनमुळे अनेक नागरिक एकाच ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यामुळे या नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवले जाणार असल्याची माहिती मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. या सर्वांना एसटीद्वारे त्यांच्या घरी सोडले जाणार आहे. अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी राज्यात १० हजार एसटी बस सोडल्या जाणार आहेत. यासाठी २० कोटी रुपयांच्यावर अपेक्षित खर्च आहे. हा प्रवासाचा खर्च मदत व पुनर्वसन विभाग उचलणार मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


 


Post a Comment

Previous Post Next Post