आटपाडी शहरात लॉकडाऊन संपेपर्यंत दर रविवार, मंगळवार व गुरुवारी “जनता कर्फ्यू” ; मेडिकल व दवाखाने वगळता सर्व सेवा राहणार बंद ; सरपंच सौ. वृषाली पाटील यांची माहिती 

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन संपेपर्यंत आठवड्यातील प्रत्येक रविवार, मंगळवार व गुरुवारी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आटपाडीच्या सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांनी दिली.
आटपाडी तालुक्यातील नागरीक नोकरी व व्यावसायिक कामानिमित्त पुणे, मुंबई सारख्या शहरात मोठ्या संख्येने आहेत. तर गलाई बांधव देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरामध्ये असणाऱ्या नागरिकांना आपपाल्या गावामध्ये जाण्यास परवानगी दिली असून या परवानगीमुळे अनेक नागरीक मोठ्या संळ्येने तालुक्यात येणार आहेत. त्यांना क्वारंनटाईन करण्याची व्यवस्था असली तरी अनेकजण प्रशासनाची नजर चुकवून येत आहेत. त्यातच आपल्या तालुक्याच्या सीमा असणऱ्या सोलापूर जिल्हात कोरोनाने शतक पार केले आहे तर सातारा जिल्ह्याने अर्धशतक पार केलेले आहे. तर आपल्या जिल्ह्यामध्ये अजून ही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. 
त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन संपेपर्यंत आटपाडी शहरात आठवड्यातील दर रविवार, मंगळवार व गुरुवारी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय आटपाडी ग्रामपंचायत येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून दवाखाने व मेडिकल वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. या बैठकीला तालुक्यातील व्यापारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Post a Comment

0 Comments