कामगार दिनी आटपाडी पोलिसांना विराज शुगर कडून बासुंदी वाटप


कामगार दिनी आटपाडी पोलिसांना विराज शुगर कडून बासुंदी वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
निंबवडे/राघव मेटकरी : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन याचे औचित्य साधुन खानापूर तालुक्याचे नेते माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या विराज शुगर कडून श्रीखंड, बासुंदी, इत्यादी चे वाटप सर्व पोलिस अधिकारी आणि होमगार्ड याना वाटप करून कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ.तुषार पवार, किशोर गायकवाड, उमेश पाटील, प्रभाकर नांगरे-पाटील, अश्विनकुमार नांगरे-पाटील, भूषण देशमुख, तेजस पवार, राघव मेटकरी, रियाज मुल्ला, गौरव चव्हाण, अमर हेकणे उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय अधिकारी आणि पोलिस यंत्रणा जीवाचे रान करत असताना त्यांची काळजी करुन सदाशिवराव पाटील यांच्या या आदर्शवत कार्यक्रमाची तालुक्यात चर्चा आणि कौतुक होत आहे.


आटपाडी खानापूर तालुक्यातील जनतेने नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे. त्यांच्या सुख दुःखात नेहमीच सहभागी होताना आम्ही आमची बाजू कायम लोकांना आधार देण्याच्या बाजूने ठेऊ. आटपाडी मधील कर्मचारी अधिकारी यांना साथ देताना संकटात त्यांच्या मागे पहाड बनून उभा राहू, काही मंडळी प्रशासनाला अडचणीत आणून सत्तेची मजा चाखत आहेत त्यांच्यासाठी कृतीतून ही चपराक आहे. सत्तेचे वेगवेगळ्या मार्गांनी लाभ घेतलेल्या मंडळींनी अशा वेळी पुढाकार घेऊन लोकांना मदत करावी
वैभवदादा पाटील 
माजी नगराध्यक्ष विटाJoin Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

Previous Post Next Post