दुधेभावी येथील कोरोना बाधिताच्या पत्नीलाही कोरोणाची लागण ; खेराडे वांगी प्रकरणाशी निगडित सर्वांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आता होम क्वारंटाईनमध्ये ठेवणार : जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी

दुधेभावी येथील कोरोना बाधिताच्या पत्नीलाही कोरोणाची लागण ; खेराडे वांगी प्रकरणाशी निगडित सर्वांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आता होम क्वारंटाईनमध्ये ठेवणार : जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी


दुधेभावी येथील कोरोना बाधिताच्या पत्नीलाही कोरोणाची लागण
खेराडे वांगी प्रकरणाशी निगडित सर्वांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आता होम क्वारंटाईनमध्ये ठेवणार : जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी
माणदेश एक्स्प्रेस न्युज
सांगली :  मुंबईहून  कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी येथे आलेला एक जण कोरोणाबाधित ठरल्याने या रुग्णांशी संबंधित कुपवाड, दुधेभावी, बामनोली येथील 28 जणांना मिरज येथील आयसोलेशन कक्षात ॲडमिट करण्यात आले होते व त्यांचे स्वाब कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. यामधील 26 जणांचा कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला असून यात सदर कोरोणाबाधित रुग्णाच्या पत्नीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर अन्य 25 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रुग्णाशी संबंधित अन्य दोन व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.
सद्यस्थितीत जिल्ह्यात उपचाराखालील कोरोना रुग्णांची संख्या पाच झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. 
तसेच खेराडे वांगी ता.कडेगाव येथे मुंबईहून आणलेल्या मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराशी संबंधित 30 जणांना संस्था क्वारंटाईन करण्यात आले होते. या सर्वांचे सात दिवसानंतर कोरोणा चाचणीसाठी घेतलेल्या स्वाबचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना संस्था क्वारंटाईन मधून होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

0 Comments