देशातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढले ; केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश केला जारी 


देशातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढले ; केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश केला जारी 
माणदेश एक्स्प्रेस न्युज
मुंबई : देशातील लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली असून तो १७ मे पर्यंत वाढविण्यात आले असून याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश जारी केला आहे. या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जा ३ मे पर्यंत लॉकडाऊनची मुदत दिली होती. परंतु आता लॉकडाऊनची मुदत दोन आठवड्यांनी वाढविण्यात आली असून लॉकडाऊन १७ मे पर्यंत कायम राहणार आहे. गृह मंत्रालयाने लॉकडाऊन दरम्यान रेड, ग्रीन आणि ऑरेज झोनमध्ये कोणत्या उपाययोजना हाती घ्याव्यात, याबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
कोरोनाचे संक्रमण थोपविण्यासाठी सरकारने रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे तीन विभाग तयार केले आहेत. कोणत्या विभागात कोणती सूट द्यायची, याची माहिती मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 35 हजाराच्या पुढे गेली आहे, अशा स्थितीत हे संक्रमण रोखण्याचे मोठे आव्हान केंद्र सरकारसमोर आहे. 


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured