Type Here to Get Search Results !

पत्रकारांना ५० लाखांचे विमा संरक्षणासह लॉक डाऊन संपेपर्यंत ६ हजार मानधन द्यावे ; नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांची मागणी


पत्रकारांना ५० लाखांचे विमा संरक्षणासह लॉक डाऊन संपेपर्यंत ६ हजार मानधन द्यावे ; नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांची मागणी
माणदेश एक्सप्रेस न्युज
महुद/वैभव काटे : शासनाने कोरोना विषाणूचा प्रदर्भाव रोखण्यासाठी 17 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. कोरोना विषाणूशी लढताना व  कर्तव्य बजावताना अनेक डॉक्टर, नर्स, वार्डबॉय व पोलिस अधिकारी हे स्वतः कोरोना कोविड 19 विषाणूने संक्रमित झाल्याचे निदर्शनास येत आहे. अशा गंभीर परिस्थितीत दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, नियतकालिकांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे, विविध वर्तमानपत्रात लेख लिहणारे पत्रकार, स्तंभलेखक हे स्वतःचा जीव धोक्यात घालून पत्रकारिता करत आहेत. समाजातील तळागळातील बातम्या देण्यासाठी पत्रकारांना अनेक ठिकाणी प्रसंगी संक्रमित विभागात जावे लागते. पत्रकार हा समाजातील आरसा आहे. सत्य जनतेपर्यंत पोचवणारे माध्यम आहे. प्रामाणिक पत्रकारिता करीत असताना जर पत्रकारांना कोरोना कोविड 19 या विषाणूची लागण झाली तर संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येऊ शकते. 


हे ही वाचा :- माळशिरस मध्ये युवकाचा दोरीने गळा आवळून खून


त्यामुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला संरक्षण देणे काळाची गरज आहे. ज्याप्रमाणे शासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सोबतच तलाठी व ग्रामसेवक यांनासुद्धा 50 लाखांचा विमा जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या पत्रकारांना पन्नास लाखांचा विमा घोषित करून लॉकडाउन संपेपर्यंत प्रति महिना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे. या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते माळशिरसचे माजी सरपंच विकास (दादा) धाईंजे, नॅशनल दलित फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव तानाजी गिते, राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे, पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबासाहेब सोनवणे, माळशिरस तालुका अध्यक्ष दत्ता कांबळे यांनी माळशिरसच्या प्रांताधिकारी  शमा पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व सदर विषयाचे गांभीर्य लक्षात आणले. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री यांना सुद्धा पाठवली आहे. 


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies