Type Here to Get Search Results !

दूध खरेदी कमी दराने खरेदी करणे हा दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय ; या युवा सेना नेत्याचे तहसिलदार यांना निवेदन


दूध खरेदी कमी दराने खरेदी करणे हा दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय ; या युवा सेना नेत्याचे तहसिलदार यांना निवेदन
माणदेश एक्सप्रेस न्युज
महुद/ वैभव काटे : दूध खरेदी कमी दराने खरेदी करणे हा दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय असून याबाबत युवा सनेचे नेते सुभाष भोसले यांनी सांगोला तहसिलदार यांना याबाबत निवेदन दिले आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून बळीराजा शेतकरी हा दुग्ध व्यवसायाकडे वळला. मात्र, आता हाच दुग्ध व्यवसाय अडचणीत आला असून संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरस ने थैमान घातल्याने देश लॉक डाउन झाला आहे. याचा सर्वाधिक फटका दुध उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून दुधाचे खरेदी दर हे दुध खरेदी महासंघाने कमी केले आहेत. 


दूध महासंघ व्यवस्थापनाने दिनांक 26 /3/ 2020 पासून महानंद गोरेगाव व युनिटस येथे गाय दूध पुरवठा करणाऱ्या संघांना गाय दूध खरेदी दर बेसिक रुपये 29 . 50 प्रतिलिटर यामध्ये 04.50 प्रति लिटर ने कमी करून दूध खरेदी करावी अशा आशयाचे पत्र दुध संघांना काढले आहे. हा एक प्रकारे दूध उत्पादक शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय आहे. 
जनावरांना लागणाऱ्या खुराकाच्या वाढलेल्या किंमती आणि चाऱ्याचा विचार केला तर शेतकऱ्यांना जनावरे जगावणे अवघड झाले असतानाच गायच्या दुधाचा दर कमी केल्यामुळे दुध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. जनावरांना लागणारा खुराक ही लॉकडाऊनमुळे वेळेवरती मिळत नसल्याने दुधामध्ये मोठ्या प्रमाणात घट येत असून शेतकऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.
तसेच गाय दुध उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत असून एकीकडे कोरोणामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता असताना, दूध महासंघाने घेतलेला हा निर्णय चुकीचा असून दूध उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा व दुध दर वाढवुन शेतकऱ्यावर होणारा अन्याय दुर करावा. अशा आशयाचे निवेदन सांगोला तालुका युवा सेना युवाधिकारी सुभाष भोसले यांनी तहसीलदार सांगोला यांना पाठवले आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Join Free Telegram माणदेश एक्स्प्रेस


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies