आटपाडी तालुक्यात परराज्यातून आलेल्या नागरिक लागले मोकाट फिरू ; प्रशासनाने लक्ष देण्याची गरज 


आटपाडी तालुक्यात परराज्यातून आलेल्या नागरिक लागले मोकाट फिरू ; प्रशासनाने लक्ष देण्याची गरज 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोना रुग्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. या रोगावर अजूनही लस निघालेली नाही. सदरचा रोग हा संसर्गजन्य असून यावर औषध म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळणे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यामध्ये अडकलेले लोकांना आपापल्या गावी जाण्यास परवागनी दिली आहे. तर केंद्र सरकारने सुद्धा ज्या-त्या राज्यातील नागरिकांना जाण्यास मुभा दिली आहे. परंतु ही मुभा देताना त्या व्यक्तीने सरकारने जे नियम घालून दिले आहेत ते सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. यामध्ये किमान १४ दिवस तरी होम क्वारंनटाईन किंवा संस्था क्वारंनटाईन होणे गरजेचे आहे. 
परंतु आटपाडी तालुक्यात मात्र याच्या नेमके उलटे होवू लागले असून बाहेरच्या राज्यातून आलेले नागरीक आज एका गावात तर उद्या एका गावात असे मोकाट फिरू लागले आहेत. याबाबत तालुक्यातील पळसखेल ग्रामपंचायतीने आटपाडीच्या तहसीलदार व पोलीस स्टेशन कार्यालयाला रिपोर्ट देवून कर्नाटक राज्यातील एकजण पळसखेल येथे एकजण आला असून त्याला ग्रामपंचायतीने होम क्वारंनटाईन होण्यास सांगितले असता त्याने होय म्हणून दुसऱ्या गावात पोबारा केला. यावरच न थांबता त्याने परत पळसखेल येथे आला आहे असे सांगितले. परंतु प्रशासनाकडून अजून कोणतीही कारवाई होत नाही. जर प्रशासनाने कारवाई करण्यास विलंब लावला व पुढे काही अनर्थ घडला तर जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
त्यामुळे प्रशासनाने ताबडतोप सदर व्यक्तीवर कारवाई करत त्याला संस्था क्वारंनटाईन करावे. अशी मागणी पळसखेल ग्रामपंचायत कडून करण्यात आलेली आहे.  


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस   


Post a Comment

Previous Post Next Post