दिव्यांग निधी वाटपासाठी दिव्यांगांनी आपली कागदपत्रे ११ मे पर्यंत सादर करावीत

दिव्यांग निधी वाटपासाठी दिव्यांगांनी आपली कागदपत्रे ११ मे पर्यंत सादर करावीत


दिव्यांग निधी वाटपासाठी दिव्यांगांनी आपली कागदपत्रे ११ मे पर्यंत सादर करावीत 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : दिव्यांग निधी वाटपासाठी दिव्यांगांनी आपली कागदपत्रे ११ मे पर्यंत सादर करावीत असे आवाहन आटपाडीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. वृषाली पाटील यांनी केले आहे.
आटपाडी शहरातील सर्व दिव्यांग व्यक्तींना (अंध, अस्थीव्यंग, मुकबधीर, कर्णबधिर, बहुविकलांग वगैरे ) 31 मार्च 2020 अखेरचा दिव्यांग निधी आटपाडी ग्रामपंचायत मार्फत लवकरच दिव्यांग व्यक्तींना वितरित करण्यात येणार आहे. यासाठी तरी आटपाडी गावांतर्गत असणाऱ्या सर्व व्यक्तींनी दिव्यांग दाखला (जिल्हा सिव्हिल सर्जन यांचे सही शिक्क्याचा), आधार कार्ड (आटपाडी पत्ता असलेले). रेशन कार्ड (आटपाडी पत्ता असलेले), बँक पासबुक (संपूर्ण नाव अकाउंट नंबर आयएफसी कोड सहित) विहित नमुन्यातील अर्ज फोटोसह या कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी स्वतः त्या सत्य प्रत करून, सोबत विहित नमुन्यातील अर्जामध्ये संबंधित माहिती लिहून, त्या अर्जावर स्वाक्षरी करून आटपाडी ग्रामपंचायत मधील लिपिक अनिता ढोबळे 9145703428 यांच्याकडे कार्यालयीन वेळेत स्वतः किंवा इतर मार्फत लवकरात लवकर जमा करावीत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण कोणीही ग्रामपंचायत मध्ये एकत्र येऊ नये तसेच गर्दी करू नये. असे आवाहन सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील यांनी केले आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


 


Join Free Telegram माणदेश एक्स्प्रेस


Post a comment

0 Comments