गोपीचंद पडळकरांना भाजपने विधान परिषदेवरती संधी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी 

गोपीचंद पडळकरांना भाजपने विधान परिषदेवरती संधी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी 


गोपीचंद पडळकरांना भाजपने विधान परिषदेवरती संधी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : गोपिचंद पडळकर यांना भाजपाने विधान परिषदेवरती संधी द्यावी, अशी मागणी आटपाडी  तालुक्यातील गोपिचंद पडळकर समर्थकांमधून जोर धरू लागली असल्याची माहिती गोपीचंद पडळकर साहेब सोशल मिडिया सांगली जिल्हा संपर्कप्रमुख अनिल सूर्यवंशी यांनी दिली.
यावेळी अनिल सूर्यवंशी म्हणाले, गोपिचंद पडळकर यांना मानणारा महाराष्ट्र राज्यात मोठा वर्ग असून त्यांनी आजपर्यंत पक्षाने देईल ती जबाबदारी यशस्वीपणे व पारदर्शकरित्या पार पाडली आहे. तसेच त्यांनी शहरी भागासह ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत पक्ष वाढीसाठी कसून प्रयत्न केला आहे व पक्षाची पाळेमुळे भक्कम केली आहेत. बारामती सारख्या मजबूत मतदार संघातही पडळकरांनी विरोधकांना दखल घ्यायला भाग पाडले होते. आटपाडी खानापूर हा त्यांचा हक्काचा मतदार संघ असताना त्यांना पक्षाने बारामती मधु उमेदवारी दिली व खऱ्या अर्थाने  भाजपने राष्ट्रवादी समोर तगडे आवाहन निर्माण केले होते व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपिचंद पडळकर यांच्या माध्यमातून बारामती करांची पुरती गोची केली होती. गोपीचंद पडळकर यांना जत किंवा आटपाडी खानापूर मतदार संघातून त्यावेळी उमेदवारी दिली असती तर त्यांनी बाजी मारली असती, असे त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसांगता सभेत काढले होते. या सर्वांचा विचार करून त्यांना विधान परिषदेत संधी देण्यात यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी जोर धरू लागली आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments