गाव कृती समिती व अजनाळे ग्रामस्थांनी कोरोना संकटाशी केले दोन हात

गाव कृती समिती व अजनाळे ग्रामस्थांनी कोरोना संकटाशी केले दोन हात


गाव कृती समिती व अजनाळे ग्रामस्थांनी  कोरोना संकटाशी केले दोन हात
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : सध्या संपूर्ण देशभर   कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असून कोरोना विषाणूने  सांगोला तालुक्यांतील ग्रामीण भागातही  शिरकाव केल्यामुळे प्रशासन  कामाला लागले असून कोरोना व्हायरस  ला प्रतिबंध करण्यासाठी शासन याला  सर्व स्तरातून प्रयत्न करत आहे. त्यामुळे राज्यामध्ये संचारबंदी व लॉकडाऊन १७ मे पर्यंत लागू करण्यात आले आहे. कोरोना व्हायरस चा ग्रामीण भागामध्ये शिरकाव होऊ नये म्हणून अजनाळे ग्रामपंचायतीने गाव पातळीवर अनेक उपाय योजना केल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, यांना सेनीटायझर, मास्क वाटप करण्यात आले असल्याची माहिती ग्रामसेवक शहाजीराव इंगोले यांनी दिली. अजनाळे गावांमध्ये ग्रामसेवक व सरपंच यांच्या पुढाकाराने गावामध्ये निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे. गाव कृती समितीच्या वतीने गावामध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांना होमक्वारंटाईन केले जाते त्यांच्यावर आरोग्य कर्मचारी बारकाईने लक्ष ठेवतात. आज पर्यंत अजनाळे गावामध्ये प्राथमिक उप आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये ३५  नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.  क्वारंटाईन केलेल्या कोणत्याही नागरिकाला ताप, सर्दी, खोकला यासारखी कोरोनाव्हायरस ची लक्षणे आढळून आली नाहीत.  
ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी कोरोना संकटाशी दोन हात केले आहेत. सरपंच, ग्रामसेवक, गाव कामगार तलाठी, पोलीस पाटील, यांनी स्वस्त धान्य दुकानाला वारंवार भेटी देऊन नागरिकांना शासनाकडून आलेल्या प्रमाणाने धन्य मिळते का नाही याची चौकशी करतात तसेच ग्रामसेवक शहाजीराव इंगोले यांनी गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींना, उद्योगपती व  सामाजिक संस्थांना प्रोत्साहन करून गावातील गोरगरीब कुटुंबांना २५० जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे गोरगरिबांना दिलासा मिळाला. कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी गावातील नागरिकांना मास्क वापरण्यासाठी सरपंच अर्जुन कोळवले यांच्याकडून नागरिकांना वारंवार सूचना केली जाते व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. अजनाळे गावाला पोलीस निरीक्षक  राजेश गवळी  व  गट विकास अधिकारी  संतोष राऊत, सोलापूर जिल्हा समाज कल्याण सभापती संगिता धांडोरे, सांगोला पंचायत समिती सभापती राणी कोळवले यांनी भेट दिली आहे. गाव कृती समितीच्या माध्यमातून गाव कामगार तलाठी किरण बाडीवाले, ग्रामसेवक शहाजीराव इंगोले, पोलीस पाटील संतोष भंडगे, कृषी सहाय्यक दीपक ऐवळे, कोतवाल नवनाथ इंगोले, आरोग्य सेवक अशोक कलाल हे अधिकारी व कर्मचारी गावासाठी विशेष काळजी घेत असून प्रशासनाला गावातून  ही साथ चांगल्या प्रकारे मिळते आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य संगम धांडोरे, सरपंच अर्जुन कोळवले, प्रा.हनुमंतराव कोळवले, सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक विजयदादा येलपले, उद्योगपती विष्णू देशमुख, यांनी कोरोनाशी दोन हात केले असल्याचे गावात पहावयास मिळत आहे.


कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव झाल्यापासून अजनाळे ग्रामपंचायतीने विशेष काळजी घेतली आहे. शासनाने दिलेल्या  सर्व सूचनांचे पालन करत   गावातील छोट्या मोठे व्यवसाय बंद ठेवुन नागरिकांनी सहकार्य केले आहे. कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले असून गावांमध्ये सोडियम क्लोराइड जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे.
ग्रामसेवक, शहाजीराव इंगोले


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments