Type Here to Get Search Results !

चेकपोस्टवर ड्युटीला असलेल्या शिक्षकाला ट्रकने उडविले I शिक्षक जागीच ठार I घटना कोठे घडली वाचा सविस्तर


चेकपोस्टवर ड्युटीला असलेल्या शिक्षकाला ट्रक चालकाने उडविले I शिक्षक जागीच ठार I घटना कोठे घडली वाचा सविस्तर
माणदेश एक्सप्रेस न्युज
जत:  जत तालुक्यातील डफळापूर नजिकच्या चेकपोस्टवर पोलिसांसोबत नाकाबंदीच्या ठिकाणी मदतीस म्हणून ड्युटीवर असलेल्या एका शिक्षकाला चेकपोस्टवरून पळालेल्या भरधाव ट्रक चालकाने अंगावर ट्रक घालून चिरडले, त्यात मदतनीस शिक्षक जागीच ठार झाला. नानासाहेब (पिंटू) सदाशिव कोरे वय- 36 रा. डफळापूर (शाळा कोळी वस्ती,डफळापूर) असे ठार झालेल्या शिक्षकांचे नाव आहे. तर संजय बसगौंडा चौगुले वय 30 हा थोडक्यात बजावला. डफळापूर स्टँडनजिक मंगळवारी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास ही ह्रदयद्रावक घटना घडली. शिंगणापूर नजिकच्या आंतराष्ट्रीय चेक नाक्यावर वर हा शिक्षक नियंत्रण कर्मचारी म्हणून सोमवारी रात्रीच्या ड्युटीवर होता.
सिमेंटने भरलेला ट्रक कर्नाटकातून जतकडे निघाला होता. घटनेनंतर हणमंत रामचंद्र मुरड (वय 37 रा.नाथाचीवाडी ता. दौंड जि.पुणे), (ट्रक नं.एम एच 12 एल डी 9749) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक मनीषा डुबूले, डीवायएसपी दिलीप जगदाळे, पोलिस निरिक्षक राजाराम शेळके घटनास्थळी भेट दिली. 
अथनीकडून ट्रक चालक ट्रक घेवुन आला असता त्यास त्या ठिकाणी डयुटीवर असणारे शिक्षक नानासो सदाशिव कोरे वय 35 रा. डफळापुर ता. जत यांनी ट्रकला थांबण्याचा इशारा केला असता, ट्रक चालकाने ट्रक न थांबवता शिक्षक कोरे यांना शिवीगाळ करुन तेथुन निघुन गेला. त्यास परत थांबविण्यासाठी ऑपरेटर चौगले व कोरे यांनी ट्रकचा डफळापूर पर्यंत पाठलाग करुन त्यांनी त्यांची गाडी ट्रकच्या पुढे काढुन गाडी बाजुला लावुन परत ट्रक थांबवण्यास सांगितले असता ट्रक चालकाने ट्रक न थांबवता शिक्षक कोरे याना ट्रकने उडवुन देवुन कोरे यांच्या मृत्युस कारणीभुत झाला आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies