Type Here to Get Search Results !

धक्कादायक I विवाहतेची आत्महत्या ; मोबाईल शॉपी टाकण्यासाठी ३ लाख रुपयांच्या मागणीसाठी जाचहाट


धक्कादायक I विवाहतेची आत्महत्या ; मोबाईल शॉपी टाकण्यासाठी ३ लाख रुपयांच्या मागणीसाठी जाचहाट
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/प्रतिनिधी : माहेरहून ३ लाख रुपये घेवून ये मोबाईल शॉपी टाकायची आहे असे म्हणून सासरच्याकडून मानसिक व आर्थिक छळ होवू लागल्याने विवाह्तेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना माण तालुक्यात घडली आहे.
याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी. आसमा अस्लम मुलाणी वय २३ रा. भालवडी या विवाहितेस माहेरहून नवऱ्याला मोबाईल शॉपी टाकण्यासाठी तीन लाख रुपये घेऊन ये यासाठी सतत जाच हाट करत असल्याने या विवाहितेने आज पहाटे आपल्या राहत्या घरात भालवडी ता. माण येथे गळफास लाऊन आत्महत्या केली. याप्रकरणी नवरा असलम जाफर मुलाणी, सासरा जाफर दादाभाई मुलाणी, सासू अफसाना जाफर मुलाणी, दुसरी सासू अमजद जाफर मुलाऩी यांच्याविरुद्ध सूरज शिकंदर शेख रा लवंग ता.माळशिरस यांनी म्हसवड पोलीस ठाण्या तक्रार दिली असून अधिक तपास सपोनि गणेश वाघमोडे करत आहेत.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


 


Join Free Telegram माणदेश एक्स्प्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies