चिनके व राजुरी गावातील ग्रामस्थांना यांनी केले जीवनाश्यकवस्तूचे वाटप

चिनके व राजुरी गावातील ग्रामस्थांना यांनी केले जीवनाश्यकवस्तूचे वाटप


चिनके व राजुरी गावातील ग्रामस्थांना यांनी केले जीवनाश्यकवस्तूचे वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणू बाबत सोलापुरातील दुर्घटनेनंतर ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर सरकारने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून संभाजी ब्रिगेड तालुका संघटक नितीन रणदिवे यांच्या वतीने बुधवार दि. ६ मार्च  रोजी चिनके व राजुरी गावातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचे  वाटप करून नितीन रणदिवे यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. 
सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव अधिक तीव्रतेने वाढत आहे. यासाठी शासनस्तरावरून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोरोना  विषाणूंच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात संचारबंदी, लॉकडाऊनचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद असल्याने गोरगरीब नागरिकांना रोजगार उपलब्ध नसल्याने दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नितीन रणदिवे यांनी नाझरे, वझरे, चिनके, राजुरी, कारंडेवाडी या गावातील गोरगरीब नागरिकांना १९६ किटचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments