कोरोनामुळे पुरोहितांची उपासमार ; अडचणीत असलेल्या पुरोहितांना प्रशासनाने मदत करण्याची पुरोहित वर्गाची मागणी

कोरोनामुळे पुरोहितांची उपासमार ; अडचणीत असलेल्या पुरोहितांना प्रशासनाने मदत करण्याची पुरोहित वर्गाची मागणी


कोरोनामुळे पुरोहितांची उपासमार ; अडचणीत असलेल्या पुरोहितांना प्रशासनाने मदत करण्याची पुरोहित वर्गाची मागणी
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : लग्न म्हणजे दोन मनांचे मिलन. ही दोन नाती संस्कार नाती जोडणारा महत्त्वाचा घटक म्हणजे पुरोहित वर्ग. मात्र कोरोना मुळे लॉकडाऊन असल्याने अनेक लग्नसमारंभा कार्यक्रम लांबणीवर पडले आहेत. याच लग्न समारंभ व त्यावरच आपली उपजीविका करणाऱ्या पुरोहित वर्गाची उपासमार होवू लागली आहे. 
आटपाडी चे तालुक्याचे ठिकाण असल्याने शहरात सर्व सोयींनी युक्त अनेक मंगल कार्यालय आहेत. यंदाही अनेकांनी मुहूर्त काढले होते. तारखा निश्चित केल्या होत्या. बुकिंगही झाले होते. अचानक कोरोना आला आणि संचारबंदी लागू झाली. त्यामुळे सारे काही ठप्प झाले. मंदिराला कुलूप लागले. अभिषेक, सत्यनारायण पूजा, वास्तुशांती, विवाह सोहळा, नक्षत्र शांती, पूजा पाठ, विवाह सोहळा विधी लांबणीवर पडल्यामुळे पुरोहित यांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. आज समाजातील इतर घटकांना विविध माध्यमातून मदत होत आहे. त्याचप्रमाणे पुरोहित वर्गालाही मदत मिळावी. प्रशासनाने लक्ष देऊन अडचणीत असलेल्या पुरोहित वर्गाला मदत करावी अशी मागणी पुरोहित वर्गातून होत आहे.
शहरातील ब्राह्मण समाजातील सधन वर्गाने पुढाकार घेऊन अडचणीत असलेल्या पुरोहितांना मदत करावी 
अतुल सुरेश पाठक (काका)


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments