आटपाडी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १० वर ; बनपुरीतील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह 


आटपाडी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १० वर ; बनपुरीतील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : बनपुरी (ता.आटपाडी) येथील एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सदरची व्यक्ती ही मुंबई जावून आली असल्याचे समजते. त्या व्यक्तींना कोरोना आजाराची लक्षणे जाणवल्याने त्याला मिरज कोविड सेंटर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी सांगितले. यामुळे बनपुरी शेजारील गावांमध्ये दक्षता घेण्यात येत आहे. आज आलेल्या अहवालानुसार आटपाडी तालुक्यातील एकूण १० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.


Jion Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments