Type Here to Get Search Results !

संचारबंदीमुळे मुले लागली पारंपारिक खेळ खेळायला...


संचारबंदीमुळे मुले लागली पारंपारिक खेळ खेळायला...
माणदेश एक्स्प्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : आजचा पालक वर्ग नोकरी व्यवसायानिमित्त इतका गुरफटून गेला आहे की त्याला त्याच्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. परिणामी मुले मोबाईलच्या आहारी गेली. घरातील टीव्ही मालिका यातच महिला गुरुफुटून गेल्या. त्यामुळे आपापसातील संवाद हरवत असून आजची मुले पारंपरिक खेळ विसरून गेल्याचे दिसत आहे. मात्र देशातील कोरोना चे संकट गडद होत असताना जिल्ह्यात वाढलेले रुग्ण, चौका-चौकात पोलिसांचा बंदोबस्त,  देशात संचारबंदीचे १४४ लागू असून संचार बंदीच्या काळात शहरातील नागरिकांना प्रशासनाच्या सूचनेचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे पालक घराबाहेर न पडता घरी थांबून कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहेत. 
शहरातील बसस्थानकाजवळील दौंड कचरनाथ बाबा हॉलमध्ये श्लोक ताटपुजे, सत्यजित डोईफोडे, यश ताटपुजे, मयूर गायकवाड, रुपेश डोईफोडे, ओंकार दौंडे, कविष देशपांडे, पुष्कर देशपांडे या बाल चमूने आई-वडिलांबरोबर एकत्र येत बुद्धिबळ, कबड्डी, खोखो, तळ्यात मळ्यात इ. पारंपारिक खेळ खेळत धमाल मस्ती, डान्स, हास्यविनोद गप्पांचा फड भरत आहे. इतर वेळी व्यस्त असल्याने एकमेकाशी अपवादानेच संवाद साधणारे शेजारी गप्पागोष्टी रंगल्याचे चित्र दिसून आले. अनेक पालक वर्ग कामावर जायचे टाळत असून आपल्या कुटुंबासमवेत वेळ देत असल्याने मुलांचा आनंद द्विगुणित झाला असून बाला ओ बाला, झिंग झिंग झिंगाट, तुला फिरवीन माझ्या गाडीवर या सारख्या लोकप्रिय गाण्यावर मुले बेधुंद तहान भुक विसरून नाचत आहेत. त्यामुळे मुलांचा हा डान्स बघत कुटुंबातील महिलांना याचा मोह आवरता येत नाही. शेजारी, सगेसोयरे, मैत्रिणी आपल्या कुटुंब प्रमुखका बरोबर एकत्र येत विविध खेळ, नाचगाणे, फुगड्या सादर करून आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देत दिवसभर धमाल-मस्ती नाचगाणे, मनोरंजन, खेळांचा आनंद लुटत आहेत.


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies