‘प्रियत्तमा प्रियत्तमा’  गाण्यातील ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीला डॉ.रामदास आठवलेंचा आसरा

‘प्रियत्तमा प्रियत्तमा’  गाण्यातील ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीला डॉ.रामदास आठवलेंचा आसरा


‘प्रियत्तमा प्रियत्तमा’  गाण्यातील ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीला डॉ.रामदास आठवलेंचा आसरा
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : ‘प्रियत्तमा प्रियत्तमा’  गाण्यातील ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीला डॉ.रामदास आठवलेंनी आपल्या संविधान या बंगल्यामध्ये आसरा दिलेला आहे.  
‘धुमधडाका’ या गाजलेल्या मराठी चित्रपटातील ‘प्रियत्तमा प्रियत्तमा’  या लोकप्रिय गाण्यामधील  अभिनेत्री सुरेखा उर्फ ऐश्वर्या राणे. ह्या १५  एप्रिलपासून ऐश्वर्या आठवलेंच्या घरी मुक्कामास आहेत. त्या सिंधुदुर्ग येथील त्यांच्या गावाच्या दिशेने निघाल्या असताना लॉकडाऊनमुळे पोलिसांनी त्यांना कोकणातील अर्ध्या वाटेवरच अडवले व पुन्हा मुंबईकडे जाण्यास सांगितले. त्यातच ऐश्वर्या यांचे सर्व सामान व कपडे चोरीस गेले. अशा अवस्थेत त्या मुंबईला परतल्या आणि त्यांनी आठवले यांची भेट घेवून सर्व परीस्थिती त्यांना सांगितली. त्यानंतर आठवले यांनी ऐश्वर्या राणे यांना स्वत:च्या घरात आसरा दिला. जोपर्यंत लॉकडाऊनचा काळ संपत नाही तोपर्यंत माझे घर हे आपलेच घर समजा, असे आठवले यांनी ऐश्वर्यांना सांगितले असून त्या सध्या डॉ. रामदास आठवले यांच्या बंगल्यात वास्तव्यास आहेत.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


 


Post a Comment

0 Comments