कोळेगावातील तो प्रकार Moke Drill चा असल्याचे उघड 

कोळेगावातील तो प्रकार Moke Drill चा असल्याचे उघड 


कोळेगावातील तो प्रकार Moke Drill चा असल्याचे उघड 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे :  सोलापूर शहरासह ग्रामीण भागातही कोरोना बाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील घेरडी, पेनुर, उळे या ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यातच माळशिरस तालुक्यातील कोळेगावातील दुपडेवस्ती येथे एक जण कोरोन बाधित आढळला असून त्यास सोलापूरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून रुग्ण सापडलेला परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला असल्याचा आदेश सोशल मिडियावर व्हायरल झाला. हा आदेशावर माळशिरसच्या प्रांताधिकारी शमा पवार यांची स्वाक्षरी असल्याने माळशिरस तालुक्यात धास्ती वाढली होती. मात्र हा प्रकार (Moke Drill) डेमोचा असल्याचे समजल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वायस टाकला.
कोरोना रुग्ण आढळल्यास त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपली यंत्रणा किती सज्ज आहे हे पाहण्यासाठी हा डेमो घेण्यात आला. डेमो घेण्यासाठी हा आदेश तयार केला असून हा आदेश फक्त संबंधित यंत्रणेचे कर्मचारी आणि अधिकारी यांना पाठविण्यात आला होता. कोणीतरी हा आदेश बाहेर व्हायरल केल्याने चिंता पसरली होती. माळशिरस तालुक्यात अद्यापर्यंत कोरोना बाधित रुग्ण आढळला नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही प्रांताधिकारी शमा पवार यांनी केले आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments