सांगोला विधानसभा मतदार संघातील आरोग्य केंद्रासाठी आमदार फंडातून २४०० पीपीई किट व इतर साहित्य तातडीने मिळणार : आमदार  शहाजीबापू पाटील ; थर्मल स्कॅनर, N95 मास्क, रबर ग्लोव्हज व सॅनिटायझर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार


सांगोला विधानसभा मतदार संघातील आरोग्य केंद्रासाठी आमदार फंडातून २४०० पीपीई किट व इतर साहित्य तातडीने मिळणार : आमदार  शहाजीबापू पाटील ; थर्मल स्कॅनर, N95 मास्क, रबर ग्लोव्हज व सॅनिटायझर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार
माणदेश एक्सप्रेस न्युज
महूद/वैभव काटे : सध्या जगभरासह भारतामध्ये व राज्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी व कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सांगोला विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रातील डॉक्टर व सर्व आरोग्य कर्मचारी यांना विविध यंत्रसामग्री व साहित्य यांच्या खरेदीसाठी आमदार अॅड.शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्या आमदार फंडातून पन्नास लक्ष रुपये तातडीने मंजूर केले होते.
आमदार फंडातून मंजूर केलेल्या या निधीमधून प्राथमिक आरोग्य केंद्र भाळवणी व ग्रामीण रुग्णालय सांगोला यांना 1300 पीपीई किट, 3000 N 95 मास्क, 500 मिलीच्या 300 सॅनिटायझर बॉटल्स, 2000 ट्रिपल लेयर मास्क, 3000 विविध आकाराचे रबर ग्लोव्हज, 10 इन्फारेड थर्मल स्कॅनर व 2000 व्हीटीएम किट इ.साहित्य तातडीने पुरविले जाणार आहे. तसेच मतदारसंघातील इतर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांना 900 पीपीई किट, 3000 N 95 मास्क, 500 मिलीच्या 1000 सॅनीटायझर बॉटल्स, वीस हजार ट्रिपल लेयर मास्क, 8000 कापडी मास्क, सुमारे पंधरा हजार विविध आकाराचे रबर ग्लोव्हज, 30 इन्फ्रारेड थर्मल स्कॅनर व 1000 व्हीटीएम किट असे एकूण सुमारे 50 लक्ष किमतीचे साहित्य तातडीने दिले जाणार आहे.
सांगोला तालुका व पंढरपूर तालुक्यांमध्येही कोरोना प्रभावित रुग्ण आढळल्याने त्यांच्यावर व त्यांच्या संपर्कात येणाऱ्या संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी व मदतनीस यांना या आरोग्य साहित्याची नितांत गरज असल्याने आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांनी पालकमंत्री दत्तामामा भरणे व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सदरचे साहित्य मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याने जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्य समितीने वरील सर्व साहित्य तातडीने खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. व तसे लेखी पत्र आमदार शहाजीबापू पाटील यांना दिले आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरामध्ये सर्व साहित्य संबंधित आरोग्य केंद्रांना पुरवले जाणार असल्याची माहिती आमदार अॅड.शहाजीबापू पाटील यांनी दिली. 
कोरोना विषाणूंचा पार्श्वभूमीवर सांगोला मतदारसंघातील नागरिकांना लॉकडाऊन चे सर्व नियम काटेकोरपणे पाळून दिलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करावी व घरातच राहून आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याचीही दक्षता घ्यावी असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad