जीवाची बाजी लावत कोरोना विरुध्द रस्त्यावर उतरुन लढाई लढणाऱ्या म्हसवड पोलिसांची आरोग्य तपासणी 

जीवाची बाजी लावत कोरोना विरुध्द रस्त्यावर उतरुन लढाई लढणाऱ्या म्हसवड पोलिसांची आरोग्य तपासणी 


जीवाची बाजी लावत कोरोना विरुध्द रस्त्यावर उतरुन लढाई लढणाऱ्या म्हसवड पोलिसांची आरोग्य तपासणी 
माणदेश एक्स्प्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : जीवाची बाजी लावत कोरोना विरुध्द रस्त्यावर उतरुन लढाई लढणाऱ्या म्हसवड मधील पोलीसदादांची आरोग्य तपासणी मायणी येथील रुरल इन्स्टिट्यूट  ऑफ आयुर्वेद हॉस्पिटल ॲन्ड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्च सेंटर यांच्या वतीने करण्यात आली. मधुमेह आणि हृदयविकार असणाऱ्या पोलीसांची रक्ततपासणी ही करण्यात आली. 
कोरोना विषाणूविरुध्दच्या लढाईत आरोग्य विभागाबरोबरच पोलीसही मोठे योगदान देत आहेत. जीवावर उदार होवून कोरोनाचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस रात्रंदिवस रस्त्यावर खडा पहारा देत आहेत. ही लढाई लढताना राज्यात काही पोलीसांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याच्या घटना घडल्या आहेत. माण आणि खटाव तालुक्यात अद्याप कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. पोलीसांच्या खडा पहारा, संचारबंदी तसेच  जिल्हाबंदी कायद्याच्या कडक अंमलबजावणी आणि  सतर्कतेमुळे दोन्ही तालुक्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. छ.शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. जयकुमार गोरे, संस्थापक डॉ.एम.आर. देशमुख, सचिव सोनियाताई गोरे यांच्या संकल्पनेतून पोलीसांची आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले. बुधवारी  म्हसवड येथे डॉ. राजेंद्र दलाल, डॉ.सागर खाडे, डॉ.रोहित जाधव, डॉ. ऐश्वर्या लाडगे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिवसभर पोलीसांच्या रक्तातील साखर, ईसीजीसह  विविध तपासण्या केल्या. मधुमेह आणि ऱ्हदयविकार असणाऱ्या पोलीसांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

0 Comments