वाघ्यामुरळी कलाकार झाले बेरोजगार; कोरोना संकटामुळे आली उपासमारीची वेळ

वाघ्यामुरळी कलाकार झाले बेरोजगार; कोरोना संकटामुळे आली उपासमारीची वेळ


वाघ्यामुरळी कलाकार झाले बेरोजगार; कोरोना संकटामुळे आली उपासमारीची वेळ
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : देशामध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असून राज्यातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाल्याने हातावर पोट असणाऱ्या वाघ्या मुरळी कलाक्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांची बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने या कलाकारांना तात्काळ मदत करावी अशी मागणी वाघ्या मुरळी कलाकार सिद्धु  चव्हाण  यांनी केली आहे. वाघ्या मुरळी मध्ये काम करून मिळालेल्या मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह  करून घरात चुल पेटती केली जात असे. मार्च, एप्रिल, मे महिन्यात लग्न समारंभ, यात्रा, मोठ्या प्रमाणात असतात मात्र कोरोना व्हायरस चे सावटामुळे सर्व कार्यक्रम रद्द झाले. परिणामी याचा कार्यक्रमाद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातुन प्रत्येक कलाकाराचा उदरनिर्वाह होत असतो. पण चे सर्व कार्यक्रमावरती कोरोना व्हायरसचे संकट असल्याने कलाकारांची चिंता वाढली आहे. रोजगार उपलब्ध नसल्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, राजकीय पुढारी, यांनी पुढे येऊन वाघ्या मुरळी कलाकारांना मदत करावी अशी मागणी केली जात आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments