भावना दुखावल्या गेल्यात, सर्वांची माफी मागतो 

भावना दुखावल्या गेल्यात, सर्वांची माफी मागतो 


भावना दुखावल्या गेल्यात, सर्वांची माफी मागतो!
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : काल छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा उल्लेख थोर सामाजिक कार्यकर्ते असा करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भावना दुखावल्या गेल्यात त्या सर्वांची माफी मागतो असे Tweet करून राज्यातील शिव-शाहू भक्तांची माफी मागितली असून दिलगिरी व्यक्त केली आहे. 
त्यांनी काल twitter द्वारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त थोर सामाजिक कार्यकर्ते शाहू महाराज यांना शत शत नमन!  केले होते. परंतु त्यांच्या या tweet ला मोठ्या प्रमाणात टोल व्हावे लागले होते. श्रीमंत शाहू छत्रपती. खास. संभाजी छत्रपती यांनी माफी मागण्यास सांगितले तर इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर निषेध नोंदविला होता.हा सर्व प्रकार समजताच देवेंद्र फडणवीस यांनी भावना दुखावल्या गेल्यात, सर्वांची माफी मागतो असे tweet केले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीस यांना सोशल मिडियाद्वारे ट्रोल केली असल्याची तक्रार केली होती. जर अशाच चुका होत असतील तर तक्रार करून काय उपयोग ट्रोल तर होणारच.  


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Join Free Telegram माणदेश एक्स्प्रेस


Post a comment

0 Comments